बेळगाव / प्रतिनिधी  

बेळगाव शहरातील सिटी होम्स गार्डन सोसायटी मधील काही उत्साही तरुणांनी काश्मीर मधील लोकप्रिय व तितकाच आव्हानात्मक समजला जाणारा ग्रेट 'लेक्स ट्रेक' यशस्वीरित्या पूर्ण केला. यानंतर येथे भारताचा राष्ट्रध्वज "तिरंगा' फडकून तरुणांनी आपला आनंद व्यक्त केला.

मोहित मोदी, कृतिक मोदी, दर्शन शहा, हर्ष चव्हाण, मोहम्मद मोहीउद्दिन, सायम जैन आणि श्रेयस पिसे अशी ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या तरुणांची नावे आहेत.

काश्मीर येथील ग्रेट लेक्स ट्रेक हा पावसाळ्यातील सर्वात आव्हानात्मक ट्रेक मानला जातो. हा ट्रेक १३,७५० उंच आणि ७५ कि. मी. अंतराचा असून पूर्ण करण्यासाठी किमान सात दिवस लागतात. हा आव्हानात्मक ट्रेक पूर्ण करणे म्हणजे ट्रेकिंग करणाऱ्यांच्या जीवनातील एक अभिमानाचा अविस्मरणीय क्षण असतो.