• कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोप 

बेळगाव / प्रतिनिधी 

हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. प्रमुख वॉर्डन बी.एल. मेलवंकी, वार्डन व्ही. टी.वाघमोरे यांना कारागृहाचे उत्तर विभाग (उपमहानिरीक्षक) टी.पी.शेष यांनी निलंबित केले आहे.

निलंबित केलेल्यांवर कारागृहातील कैद्यांचा छळ करणे आणि सशुल्क कैद्यांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी देण्याचे आरोप आहेत. अलीकडेच कारागृहात कैद्यांनी परस्पर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यासर्व बाबी लक्षात घेऊन निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे.

त्याचवेळी, कारागृहातील कैद्यांकडून मोबाईल फोन वापरण्याबाबतही चौकशी सुरू असून, एडीजीपी मालिनी कृष्णमूर्ती यांनी कारागृह उपमहानिरीक्षक, उत्तर विभाग, टी. पी. शेष यांना प्राथमिक तपास करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.