बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या दशकभरापासून देशभरातील भाजप संघटनेचे कार्यक्षमतेने नेतृत्व केलेले बी.एल.संतोष यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
फेरनिवडीबद्दल माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासमवेत भाजप कर्नाटक राज्य ओबीसी विभागाचे सचिव किरण जाधव यांनी बी. एल.संतोष यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान रमेश जारकीहोळी आणि किरण जाधव यांनी त्यांच्याशी, कर्नाटक आणि बेळगाव जिल्ह्यातील भाजप संघटनेच्या बांधणी संदर्भात चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेसाठी रमेश जारकीहोळी व किरण जाधव यांच्या हाती तिरंगा ध्वज सुपूर्द केला
बी.एल.संतोष यांची फेरनिवड झाल्याने आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा मिळेल आणि भाजपची संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास बेळगावच्या भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments