बेळगाव / प्रतिनिधी 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरोधात बेळगावात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक नियम उल्लंघनाबद्दल १६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

बेळगावातील क्लब रोड, गांधी चौक व अन्य ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियम उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करत दंड आकारला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनायक बडिगेर व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या वाहनचालकांकडून दंड आकारून,सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. हेल्मेट न घालणे, कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सर वापरणे, आरसे नसणे, कागदपत्रे व्यवस्थित नसणे, इन्शुरन्स नसणे आदी गुन्ह्यांखाली ही कारवाई करण्यात आली.