- एकूण ५२,५२,३९८ रु. मुद्देमाल ताब्यात
- अबकारी विभागाची कारवाई
खानापूर / प्रतिनिधी
कणकुंबी (ता. खानापूर) नजीक असलेल्या तपासणी नाक्यावर गोवा बनावटीचा बेकायदा मद्यसाठा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अंदाजे २,५०,००० रु. किंमतीचा ट्रक आणि २७,५२,३९८ रु. किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा असा एकूण ५२,५२,३९८ रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी गोव्यातून कणकुंबीमार्गे बेळगावकडे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा अबकारी आयुक्त मंजुनाथ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खानापूर आणि बेळगाव येथील अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांचे पथक त्यांनी कणकुंबी तपासणी नाक्यावर पाठविले. यावेळी दारूची वाहतूक करणारा ट्रक कणकुंबी तपासणी नाक्यावर आला असता ट्रक थांबवून तपासणी करण्यात आली. ट्रकच्या मागील हौद्यात कप्पे करण्यात आले होते. या कप्प्यात मोठ्या प्रमाणात दारू साठा लपविण्यात आला होता. मात्र वेल्डिंग केल्याने हे कप्पे उघडत नव्हते सदर ट्रक खानापूर येथील अबकारी खात्याच्या कार्यालयात आणून जेसीबीच्या साह्याने ट्रकचे मागील कप्पे उघडण्यात आले. त्यात गोवा बनावटीची २७ लाख ५२ हजार ३९८ रू. किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनर या दोघांनाही अटक करून खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
बेकायदा दारू वाहतूक करत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा अबकारी आयुक्त मंजुनाथ यांना मिळाली होती. त्यांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेत खानापूर आणि बेळगाव येथील अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांची कुमक येतील तपासणी नाक्याजवळ पाठवली व तपासणी केली असता ट्रकच्या मागील हौद्यात कप्पे करण्यात आले होते. या कप्प्यात मोठ्या प्रमाणात दारू साठा लपविण्यात आला होता. मात्र वेल्डिंग केल्याने हे कप्पे उघडत नव्हते सदर ट्रक खानापूर येथील अबकारी खात्याच्या कार्यालयात आणून जेसीबीच्या साह्याने ट्रकचे मागील कप्पे उघडण्यात आले. त्यात गोवा बनावटीची २७ लाख ५२ हजार ३९८ रू. ची दारू जप्त करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या या ट्रकचा चालक आणि क्लीनर या दोघांनाही अटक करून खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
अबकारी अप्पर आयुक्त वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोज खान किल्लेदार यांच्या आदेशानुसार बेळगाव अबकारी विभागाचे उपअधीक्षक रवी मुरगोड अबकारी उपायुक्त वनजाक्षी एम., रवी मुरगोड आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
0 Comments