बेळगाव : कपिलेश्वर रोडबेळगाव रामा मेस्त्री अड्डा २ रा क्रॉस येथील रणरागिणी महिला मंडळा तर्फे अधिक मांसानिमित्त हळदी- कुंकू समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. मीनाताई बेनके तसेच विश्व मांगल्या सभा बेळगाव नगरीच्या संयोजिका सौ.प्रियंका केळकर तसेच सौ. प्रज्ञाताई शिंदे उपस्थित होत्या.
महिलांनी स्वतःच्या कर्तुत्वावर प्रगती केली पाहिजे तसेच महिलांना सक्षम सुदृढ बनविण्यासाठी रामा मेस्त्री अड्डा दुसरा क्रॉस कपिलेश्वर रोड येथे रणरागिणी महिला मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अनुराधा सुतार, उपाध्यक्षा सौ. दिपा देसाई, सेक्रेटरी सौ. रुपाली संकेत पाटुकले व खजिनदार सौ. मिथाली विजय चव्हाण यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments