• बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या आदेशाने प्रभू यत्नट्टी यांना दिलासा

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष  प्रभू यत्नट्टी यांची सनद कायमस्वरूपी रद्द करण्याच्या राज्य बार कौन्सिलच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिली आहे अशी माहिती ॲड. प्रभू यत्नट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. या आदेशामुळे यत्नट्टी यांना  दिलासा मिळाला असून आगामी काळात ते पुन्हा बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी रुजू होणार आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटक बार कौन्सिलने बेळगाव बार असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करावी असा आदेश दिला होता. त्यानंतर यत्नट्टी यांना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्या विरोधात त्यांनी राज्य कौन्सिलच्या आदेशावर दिल्लीत बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागितली होती. त्यावर बार कौन्सिल ऑफ  इंडियाने स्थगिती दिली.