बेळगाव / प्रतिनिधी
एसबीआय सर्कल ते जुना पीबी रोड या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र हे रुंदीकरणअशास्त्रीय पद्धतीने झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजू टॊप्पण्णावर व सुजित मुळगुंद यांनी केली आहे. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांना याबाबत निएडन सादर करण्यात आले.
भाजप नेत्यांच्या फायद्यासाठी स्मार्ट सिटीने रस्त्याचे काम केले. कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांनी रस्ता बांधला आहे. त्याचा कोणालाच फायदा झाला नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याची तक्रार त्यांनी या निवेदनात केली आहे. स्मार्टसिटीने केलेल्या रस्त्याच्या अशास्त्रीय रुंदीकरणामुळे अन्याय झालेले कुटुंबीय न्यायालयात गेले असता न्यायालयाने बेळगाव स्मार्ट सिटीला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. रस्ता रुंदीकरणाचा स्मार्ट सिटीशी काहीही संबंध नाही. स्मार्ट सिटीचा पैसा हा जनतेचा कर आहे. स्मार्ट सिटीने नुकसानभरपाई का द्यावी? यामध्ये ज्यांची चूक झाली त्यांनी नुकसान भरपाई द्यावी. तसेच या प्रकरणातील खर्या दोषींना शिक्षा व्हावी, या रस्त्यावरून ये - जा करताना नागरिकांची गैरसोय होत आहे. आठवडाभरात याबाबत कार्यवाही न झाल्यास शहापूर एसबीआय सर्कल येथे रास्तारोको आंदोलन करून संघर्ष सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
0 Comments