- ग्रा. पं. अध्यक्षांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून शुभारंभ
कुद्रेमानी / विनय कदम
कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथे ग्रामपंचायतीमार्फत १५ व्या वित्त आयोगातील मंजूर निधीतून विविध विकास कामांना चालना देण्यात आली. या अंतर्गत टिळकवाडी गल्ली क्र. १ व २ येथे आरसीसी गटार त्याचप्रमाणे नाईकवाडी व वाचनालय येथे आरसीसी सीडीवर्कचे काम करण्यात येणार आहे. नुकताच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष संजय यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष रेणुका रामू नाईक, ग्रामपंचायत सदस्य शांताराम कल्लाप्पा पाटील, शिवाजी मुरकुटे , मलव्वा नामदेव कांबळे, आरती अनंत लोहार, मोहन पाटील, भैरू आनंदाचे, रवळू पन्हाळकर, उत्तम पाटील, जोतिबा शिवाप्पा पाटील, मारुती शामराव पाटील, राजू पाटील, मधु पन्हाळकर, पुंडलिक गुरव, काशिनाथ पाटील, अशोक पन्हाळकर, निंगाप्पा आनंदाचे, वैजू गोवेकर आदि उपस्थित होते.
0 Comments