हुबळी / वार्ताहर
हुबळी - धारवाड पोलिस आयुक्तपदी प्रथमच एका महिलेची वर्णी लागली आहे. राज्य सरकारने हुबळी - धारवाड पोलिस आयुक्तपदी आयपीएस (IPS) अधिकारी रेणुका सुकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश बजाविला आहे. रेणुका सुकुमार सन २०११ बॅचच्या आयपीएस (IPS) अधिकारी आहेत.
यापूर्वी हुबळी धारवाड पोलीस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. उपायुक्त म्हणून सेवा बजाविताना हुबळी - धारवाड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या त्या होमगार्डच्या डेप्युटी कमांडंट जनरल म्हणून कार्यरत आहेत.तर हुबळी - धारवाडचे प्रभारी आयुक्त म्हणून कार्यरत असलेले संतोष बाबू यांची बदली करण्यात आली आहे.
0 Comments