बेळगाव / प्रतिनिधी
राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी सरस कामगिरीच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन केले असून ५ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १६ पदके प्राप्त केली आहेत. दि. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी बेंगळूर येथे पार पडलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये ७ जिल्ह्यातून सुमारे १५० च्या वर स्केटर्सनी सहभाग घेतला होता.
विजेत्या स्केटर्सचे नाव फ्रीस्टाईल स्केटिंग :अवनिश कोरीशेट्टी १ सुवर्ण, १ रौप्य , देवेन बामणे २ सुवर्ण , रश्मिता अंबिगा १ सुवर्ण, १ रौप्य , हिरेन राज १ रौप्य,जय ध्यान राज २ रौप्य,यशपाल पुरोहित १ रौप्य ,दृष्टी घोटा १ कांस्य, आर .एस उज्वल साई १ कांस्य,
अल्पाईन आणि डाउनहिल स्केटिंग : साईराज मेंडके १ सुवर्ण,१ कांस्य शुभम साखे १ कांस्य.
आर्टिस्टिक स्केटिंग : खुशी आगिमणी २ रौप्य.
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असून सर्व स्केटअर्सना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडूलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए (KRSA) यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
0 Comments