- प्रभाग समिती संघटनेची मागणी
- महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
विकास आणि कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या प्रभाग समित्यांची रचना त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव प्रभाग समिती संघटनेने केली. बुधवारी सदर मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना सादर करण्यात आले.
शहराच्या विकासासाठी प्रभाग समिती आवश्यक आहे, याशिवाय कर्नाटक मुन्सिपल कायद्यानुसार स्थापना करणे बंधनकारक आहे. यासाठी आम्ही गेल्या दीड वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत त्याची दखल घेऊन तत्काळ प्रभाग समितीची रचना करावी अशी मागणी करण्यात आली.महापालिकेच्या सभागृहात ७ जून रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत पंधरा दिवसात प्रभाग समित्यांची रचना करु अशी ग्वाही दिली होती. पण, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.
यावेळी उमेश जमादार, प्रभाकर कोडकणी, प्रेम चौगुले, प्रमोद गुंजीकर, विशाल गायकवाड, बाळी आणि सर्व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments