विजयपूर / वार्ताहर
बागलकोट जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी टी. भुबलन यांची विजयपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली असून आज सोमवारी त्यांनी विजयपूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मनवर यांनी स्वागत करून त्यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सुपूर्द केला.
तीन वर्षे बागलकोट जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले टी. भुबलन यांनी यापूर्वी बिदर आणि दावणगेरे येथे प्रोबेशनर तर हरपनहल्ली आणि उडुपी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय तुमकुर महापालिका आयुक्त तसेच स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि निवडणुक काळात बेळगावचे विशेष जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
0 Comments