•  विजयपूर तालुक्याच्या नागठाण गावातील घटना

विजयपूर / वार्ताहर 

दारूचे व्यसन जडलेल्या स्वतःच्या मुलाला दारू सोडण्यास सांगितले. मात्र मुलाने दारूसाठी शेतातील वस्तू विकणे सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या बापाने फावड्याने मारहाण करून पोटच्या मुलाची निर्दयपणे हत्या केली. विजयपूर तालुक्याच्या नागठाण गावात ही घटना घडली.

मुथप्पा मासळी (वय २८) असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाचे बसप्पा मासळी असे खून करणाऱ्या निर्दयी बापाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी बसप्पा याच्यावर विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.