बेळगाव / प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात डेंग्यू व चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी खबरदारी म्हणून शहराच्या प्रभाग क्र. २९ मध्ये आज डेंग्यू - चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक नितीन जाधव यांनी सदर मोहीम राबवली. प्रभागातील नागरिकांनी मोहीम राबवल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून नगरसेवक नितीन जाधव यांचे आभार मानले.
0 Comments