बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. ५ विरुद्ध २ अशा फरकाने चारही स्थायी समिती भाजपने स्वतःकडे राखल्या आहेत. बेळगाव महापालिकेत अर्थ आणि कर ,आरोग्य आणि सामाजिक न्याय,नगर नियोजन आणि बांधकाम यासह लेखा अशा चार स्थायी समित्या आहेत. महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनंतर ही निवडणूक पार पडली.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी काम पहिले.सकाळपासूनच या स्थायी समित्यांसाठी नामपत्र भरण्याची प्रक्रिया सुरु होती. दुपारी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. चार स्थायी समित्यांमध्ये प्रत्येकी सात अशी एकूण २८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्त करण्यात आलेले सदस्य आणि स्थायी समिती..
अर्थ आणि कर दाद स्थायी समिती :
- वीणा विजापूर
- रेखा हुगार
- उदयकुमार उपरी
- संदीप जिरग्याळ
- प्रीती कंकर
- रेश्मा भैरकदार
- शामोबीन पठाण
आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्याय स्थायी समिती :
- रवी धोत्रे
- रमेश मैलगोळ
- रेश्मा कामकर
- श्रेयस नाकाडी
- जयंत जाधव
- खुर्शीद मुल्ला
- इकरा मुल्ला
नगर नियोजन आणि विकास स्थायी समिती :
- वाणी जोशी
- आनंद चव्हाण
- मंगेश पवार
- संतोष पेडणेकर
- रूपा चिखलदिनी
- जरीना फतेहखान
- शकील मुल्ला
लेखा स्थायी समिती :
- सविता पाटील
- गिरीश धोंगडी
- अभिजित जवळकर
- जयतीर्थ सौंदत्ती
- पूजा पाटील
- ज्योती कडोलकर
- अफरोज मुल्ला
वरील सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .या सर्वांचे आ.अभय पाटील यांनी अभिनंदन करून , आगामी काळात बेळगावच्या सर्व जनतेचा विकास आणि शहराच्या सर्व ज्वलंत समस्येबद्दल , सर्व सदस्यांनी तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी सर्वानी मिळून एकत्रित काम करावे असे आवाहन केले .यावेळी खा . मंगल अंगडी , आ . अभय पाटील , खा . अण्णासाहेब जोल्ले , तसेच महापौर शोभा सोमनाचे तसेच उपमहापौर रेश्मा पाटील उपस्थित होत्या .
0 Comments