खानापूर / प्रतिनिधी  

हत्तरगुंजी - गणेबैल मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. योगेश गुंडू पालेकर (रा. बिडी ता. खानापूर) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अधिक उपचारासाठी त्याला खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, योगेश गुंडू पालेकर हे हत्तरगुंजीहून गणेबैलकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर गणेबैल नजीक समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. येथे सर्व्हिस नसल्यामुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांमध्ये वाहन चालक जखमी होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.