- कोवाड बाजारपेठेत पाणी साम्राज्य, व्यापारी हवालदिल
चंदगड / प्रतिनिधी
चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून असाच पावसाचा जोर राहिल्यास कोवाड बाजारपेठेला पुराचा विळखा बसण्याची शक्यता आहे.
नांदवडे येथील नामदेव गुंडू गावडे यांच्या घराची भिंत पडून १५ हजार रुपयाचे तर चंदगड येथील अशफाक अफझल महागावकर यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले आहे.
घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी - सावर्डे, कानडेवाडी, तारेवाडी हे तर ताम्रपर्णी नदीवरील चंदगड -आसगाव, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, कोकरे, न्हावेली व जुना कोवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे संबंधित गावांचा संपर्क तुटला आहे.
अचानक जोर धरलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नदीकाठावरील पिके पुराच्या विळख्यात सापडली आहेत.भात पिकांच्या वरती पाणी आल्याने पूर ओसरला नाही तर भात पिके कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
- पर्यटन स्थळांवर जाण्यास ३ ऑगस्ट पर्यंत बंदी -
तालुक्यात सुंडी, किटवाड व बाबा धबधबा, स्वप्नवेल पॉईंट, तिलारी घाट, पारगड, गंधर्वगड, कलानंदिगड, महिपाळगड, फाटकवाडी, जांबरे व जंगमहट्टी ही पर्यटन स्थळे असून पावसाचा जोर वाढल्याने पर्यटक व नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने दि. २२ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत पर्यटन स्थळांकडे जाण्यास मज्जाव घालण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली आहे. कोवाड बाजारपेठत पूराचे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
0 Comments