- पाच पंपसेटसह वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी जप्त
- विजयपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
विजयपूर / वार्ताहर
ऐनापुरच्या दिशेने निघालेल्या संशयित दुचाकीस्वाराला थांबवून त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे चोरीचा ऐवज आढळून आला.
विजयपूर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी पहाटे ऐनापुर तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. यावेळी त्याच्याकडून शेतातील पाण्याचे चोरलेले पाच पंपसेट आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.शिवानंद चव्हाण (वय २४ रा. उकली, ता. बसनबागेवाडी, जि. विजयपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विजयपूरचे जिल्हा पोलिस प्रमुख एच. डी. अनंतकुमार,अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शंकर मारिहाळ यांच्या यांच्या नेतृत्वाखाली विजयपूर ग्रामीणचे डीएसपी जे. एच.तळकट्टी, विजयपूर ग्रामीणचे सीपीआय संगमेश पालभावी यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी संबंधितावर विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments