बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील दलित समाजाशी संबंधित विविध प्रलंबित विकास कामांना चालना दिल्याबद्दल जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांचा दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद तर्फे सत्कार करण्यात आला. दलित संघर्ष समिती आंबेडकर वॉर्डच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांची भेट घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जि. पं. सीईओ हर्षल भोयर यांनी अनेक विकास कामांना चालना दिली आहे.

यावेळी आंबेडकर वॉर्ड येथील दलित संघर्ष समितीचे राज्य समन्वयक सिद्धाप्पा कांबळे, जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार, मल्लेश चौगुले  यांनी जि. पं. सीईओ हर्षल भोयर यांचा गौरव केला.

याप्रसंगी बोलताना मल्लेश चौगुले आणि सिद्धाप्पा कांबळे यांनी बेळगाव जिल्ह्यात असलेल्या दलित वस्त्यांमधील विकास कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही बाब  जि. पं. सीईओ हर्षल भोयर यांच्या निदर्शनास आणून दिली असता, आणि या प्रलंबित विकास कामांना चालना दिली, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दलित वसाहतींना भेटी दिल्यास तेथील समस्यांची दखल घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन केले.

यावेळी राम चव्हाण, आनंद कोलकार, दिपक दबाडिया, राम मादार, विजय मादार, श्रीकांत चव्हाण, संतोष कांबळे, संतोष तळवार आदि उपस्थित होते.