बेळगाव / प्रतिनिधी
केंद्र सरकार राज्याला हक्काचा तांदूळ न देता राजकारण करत असल्याचा आरोप करत बुधवारी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यांनतर शहरातील काँग्रेस भवनापासून काडा कार्यालयातील खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयाला घेराव घालून आपला संताप व्यक्त केला.ज्या खासदारांनी राज्यासाठी आवाज उठवायला हवा होता त्यांनी मौन बाळगले अशी टीका यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.
केंद्र सरकार तांदूळ देण्यास तयार नाही. गरीब जनतेच्या तांदळाच्या बाबतीत केंद्र सरकार करत असलेले राजकारण योग्य नाही, अशी तक्रार त्यांनी केली. केंद्र सरकार जाणीवपूर्वक राज्याला तांदूळ देत नाही. जनतेला तांदूळ देण्यासाठी राज्य सरकारसमोर पेच निर्माण झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. तांदूळ वाटपात राजकीय भेदभाव करणाऱ्या केंद्र सरकारचा बेळगाव जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला.
केंद्र सरकार हे द्वेषी आणि राजकारणी असून तांदळाच्या प्रश्नावर सापत्नपाणाची वागणूक देत असल्याची टीका जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कार्तिक पाटील यांनी केली. यावेळी यल्लाप्पा शिंगे, राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके, गोपाळ दलवाई आदी उपस्थित होते.
0 Comments