- विभागाच्या सीआयडी पथकाची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
हस्तीदंतांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना वनविभागाच्या सीआयडी पथकाने अटक केली. पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी नजीक ही कारवाई करण्यात आली. नितीश अंकुश राऊत (वय ३५ रा. पेडगाव ; जि.अहमदनगर ),खंडू पोपट राऊत (वय ३४ रा. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयतांची नावे आहेत. त्यांच्याकडून १२ किलो वजनाचे हस्तीदंत जप्त करण्यात आले. वनविभागाच्या सीआयडी पथकाने वर्षभरात केलेली ही तिसरी कारवाई आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अटक करण्यात आलेले नितीश आणि खंडू हे हस्तीदंताची तस्करी आणि विक्री करण्यासाठी महामार्गावरील मांगूर सर्कल येथे ठाण मांडून होते. सीआयडीचे पोलीस महासंचालक शरदचंद्र के. व्ही., बेळगाव सीआयडी पुणे विभागाचे उपाध्यक्ष मुत्तण्णा सावरगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदलगा येथील मांगूर सर्कल येथे कारवाई करताना वनविभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांना नितीश आणि खंडू हे हस्तिदंत पिशवीत घेऊन उभे असलेले दिसले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी पुण्यातून हत्तीच्या दातांची तस्करी करून ग्राहक शोधून त्यांना विक्री केल्याचे कबूल केले.
या कारवाईत आर. पटेल, के. बी. कंठी, एस. एल. नेते, एम. ए. नायकला, एस. आर. अरविंची, आर. बी. कवळीकट्टी सहभागी झाले होते.
0 Comments