• तराफा उलटल्याने दुर्घटना 

विजयपूर / वार्ताहर 

तलावात मासेमारी करताना तराफा उलटल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मुद्देबिहाळ (जि. विजयपूर) येथील तरणा तलावात ही घटना घडली. मंजुनाथ शिवाप्पा चलवादी (वय १७) असे बुडालेल्या असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार घरच्यांना न सांगता दोघे तरुण , तलावात जाळे टाकून मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यानंतर तराफा उलटला आणि तरुण बुडाले. हा प्रकार तिथून चालेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आला आणि त्यांनी एकाला बुडताना वाचवले . वाचलेल्या तरुणाने भीतीपोटी आपला मोबाईल फोन बंद केला आणि तो बेपत्ता झाला आहे .

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत अंधारात शोधमोहिम राबविली, मात्र मृतदेह सापडला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली.