• मानव अधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी फोरमची मागणी
  • महापालिका आयुक्तांना सादर केले निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य महानगरपालिका कायद्यानुसार बेळगाव महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये स्थानिक लोकांची  प्रभाग समिती (वॉर्ड कमिटी) स्थापन करावी अशी मागणी मानव अधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी फोरमने केली आहे. आज दि. २६ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ४५ मि. फोरमच्यावतीने महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांना सदर मागणीचे निवेदन सादर करून प्रभाग समिती स्थापन करण्याची विनंती करण्यात आली. 


यावेळी बेळगाव शहर आणि तालुका संघटनेचे अध्यक्ष महांतेश होलीकट्टी, पदाधिकारी प्रमोद गुंजीकर,राजेश  देवटगी, सदानंद जाधव संघटनेचे इतर सभासद आणि शहरातील नागरिक उपस्थित होते उपस्थित होते.