बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरासह जिल्हाभरात, मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण उत्साहात आणि शांततेत पार पडला . शेकडो मुस्लिमबांधवानी इद -उल -अजा चे नमाज पठण करून , जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली . बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा एक महत्वाचा सण आहे . या दिवशी या ईदचे नमाज पठण करून , मुस्लिम बांधव पशूंची कुर्बानी देतात .
आज बेळगाव शहर तसेच नजीकच्या भागातील मुस्लिम बांधवांनी बेळगावच्या ईदगाह मैदानावर तसेच स्थानिक मशिदींमध्ये इद -उल -अजा चे नमाजपठण केले. अब्दुल रझाक मोमीन , सिराज अश्रफी यांनी नमाजपठण केले. यानंतर मुफ्ती अब्दुल अझीझ काझी , मुफ्ती जुहेर अहमद काझी, मुफ्ती मंजूर आलम यांनी बकरी ईद सणाचे महत्व सांगितले . तसेच आम्ही जी निसर्गाची , पर्यावरणाची हानी करीत आहोत त्यामुळे निसर्गचक्र बिघडून , सर्व पर्यावरणीय बदल घडत आहे .आणि याचा परिणाम मानवजातीसह सर्व चराचराला भोगावा लागत आहे . त्यामुळे विश्वशांती, समता , बंधुता , राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा तसेच पावसासाठी सामुदायिक प्रार्थना केली .त्यानंतर मुस्लिमबांधवानी , एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत ,बेळगाव शहरातच नाही तर पूर्ण देशभरात ईद साजरी केली जात आहे . सर्वानी आनंदाने ईद साजरी करा .आपापसात बंधूभाव, प्रेम कायम राखा . सर्वानी मिळून मिसळून रहा असा संदेश दिला.
माजी आमदार फिरोज सेठ यांनीही बकरी ईदच्या शुभेच्छा देताना कायदयाच्या चौकटीत राहून आपले सण साजरे करा. आपल्या एखाद्या गोष्टीमुळे कोणाचे मन दुखावणार नाही असे आपल्याला वागायचे आहे. तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल आणि याच्याशी आमच्या सर्वांच्या मुलांचे भविष्य जोडले गेले आहे असे सांगितले.
यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.एकंदरीत बेळगाव शहरात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला .
0 Comments