बेळगाव / प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शांताई विद्या आधार योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते ॲलन मोरे, सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांच्याहस्ते नुकताच हा धनादेश विद्यार्थिनीला सुपूर्द करण्यात आला.
गेल्या ९ वर्षांपासून शांताई विद्या आधार संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना मदत करत आहे, शांताई विद्या आधार संस्थेने गेल्या ८ वर्षांपासून जुन्या वर्तमानपत्राची रद्दी गोळा करून ५० लाख रुपये जमा केले आहेत.
बेळगाव शहरातून साडे ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तसेच गंगाधर पाटील यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून अशा संस्थांना मदत करतात.
विद्या आधारचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, ते जुनी वर्तमानपत्रे, पुस्तके इत्यादी गोळा करतात आणि त्याची रद्दी विकतात. त्यातून जमा झालेला सर्व निधी गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरला जातो.
0 Comments