• आ. विठ्ठल हलगेकर यांची मागणी  
  • केएसआरटीसीचे बेळगाव डीसी राठोड यांची घेतली भेट 

खानापूर / प्रतिनिधी 

बेळगाव ते खानापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व शिक्षणासाठी बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने खूप गर्दी होत आहे. यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी आज दि. १५ जून रोजी केएसआरटीसीचे बेळगाव डीसी राठोड यांची भेट घेऊन खानापूर ते बेळगाव जादा बस सोडण्याची मागणी केली आहे. 

या मागणीवर डीसी राठोड यांनी उद्यापासून बेळगाव - खानापूर जादा बसेस सोडण्याची ग्वाही दिली. यावेळी आ. विठ्ठलराव हलगेकर यांच्यासह भाजपाचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी उपस्थित होते.