- लक्ष्मी हेब्बाळकर यांची उडपीच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकृतरित्या राज्यातील ३१ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची अपेक्षेप्रमाणे बेळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महिला आणि बालकल्याणमंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची उडपी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळूरहून आज हा आदेश जारी करण्यात आला आहे.
0 Comments