• चिक्कोडी तालुक्याच्या सदलगा शहरानजीक घटना 

चिक्कोडी / वार्ताहर 

चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरानजीक दूधगंगा नदीत बुडून  एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. सागर दिनकर वाळके (वय २२ रा. शिरगाव ता. चिक्कोडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सागर हा त्याच्या नातेवाईकांच्या घरी आला होता. 

बुधवारी दुपारी तो काकीसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर आला होता. यावेळी पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरला असता तो बुडू लागला. हे पाहताच  त्याची मावशी मिनाक्षी कांबळे यांनी आरडाओरडा सुरू केली. आरडाओरड ऐकून नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान येथील सुकुमार उगारे यांनी ही बाब सदलगा अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सदलगा अग्निशमन दलाचे जवान व बेळगाव एसडीआरएफच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र यश आले नाही. आज पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू असताना दुपारपर्यंत सागरचा मृतदेह सापडला. याप्रकरणाची नोंद सदलगा पोलिस स्थानकात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.