बेळगाव / प्रतिनिधी
पत्नीला मारण्यासाठी देशी पिस्तुल खरेदी करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन बाबासाहेब रायमाने (रा.चिक्कोडी ता. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पत्नी हर्षिताचे दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करून सचिनने गेल्या १५ दिवसांपूर्वी तिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर तिच्या हत्येचा कट रचून सचिनने कुपवाड (ता. मिरज ; जि. सांगली) येथून पिस्तूल खरेदी केले आणि तो मिरज रेल्वे स्थानकावर फिरत होता. संशय आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने पिस्तूल खरेदी केल्याचे कबूल केले. त्यामुळे मिरज पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान, सचिनची पत्नी हर्षिता हिनेही सचिनविरुद्ध चिक्कोडी पोलिसात फिर्याद देऊन तिच्या संरक्षणाची मागणी केली आहे. माझा पती मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. याबाबत मी यापूर्वीच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे असे तिने याने स्पष्ट केले आहे.
0 Comments