बेळगाव / प्रतिनिधी
प्रतिष्ठीत भारत विकास परिषदेच्या नूतन "प्रांतीय" पदाधिकाऱ्यांचा दायित्वग्रहण समारोह रविवारी सिंधनूर येथे उत्साहात पार पडला. कर्नाटक उत्तर प्रांतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बेळगाव शाखेच्या दोन सदस्यांची प्रमुख पदांवर नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कर्नाटक उत्तर प्रांतच्या अध्यक्षा म्हणून स्वाती घोडेकर आणि राष्ट्रीय समूहगायन प्रांतप्रमुख म्हणून विनायक मोरे यांना दायित्व देण्यात आले.
राष्ट्रीय सचिव बी. के. तिप्पेस्वामी यांनी त्यांना शपथ देवविली. प्रांतचे मावळते अध्यक्ष पुरूषोत्तमदास इनाणी यांनी नूतन अध्यक्षांना अधिकार सुपूर्द केले. भारत विकास परिषदेतर्फे अनेक संस्कारक्षम सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.
यावेळी बेळगाव शाखेच्यावतीने परिषदेचे विभागीय सेवाप्रमुख पांडुरंग नायक, शाखाध्यक्ष विनायक घोडेकर, सचिव मालतेश पाटील, खजिनदार रामचंद्र तिगडी आदि सिंधनूर येथे उपस्थित होते.
0 Comments