• सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांची मागणी
  • आ. आसिफ उर्फ राजू सेठ यांना दिले निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने तळ गाठला आहे. जलाशयातील डेड स्टॉक उपसण्याचे संकेत दिसू लागले आहेत. दरम्यान बेळगाव शहरातील पाणीटंचाईचे संकटही तीव्र झाले आहे.

शहरातील वॉर्ड क्र. २५ मध्येही पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांची (वैभव नगर) येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन पाणी समस्या दूर करण्यासाठी वॉर्ड क्र. २५ मध्ये बोअरवेलची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.

सदाशिवनगर शेवटच्या चौकात आठवड्यातून एकदाच पिण्याचे पाणी येते. इतर वेळी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर सुरू आहे.तेव्हा या परिसरात बोरवेलची सुविधा उपलब्ध करून पाणीटंचाई दूर करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी अकील देसाई, जमीन देसाई, अश्विन पुराणिक, केदार देसुरकर, सागर शिंदे, सुरेश हलवाई  यांच्यासह इतर उपस्थित होते.