- खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
- नेसरी येथे भाजपाचा मेळावा
चंदगड / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्याला केंद्रबिंदू मानून गेल्या ९ वर्षात उज्ज्वला गॅस, जनधन, किसान सन्मान व जलजीवन योजनेसारख्या १८० महत्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अविश्रांत भाजपाचे लोकहिताचे काम तळागाळापर्यंत पोहचवा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. नेसरी येथे मोदी सरकारची ९ वर्षे या उपक्रमांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
सुरुवातीला अँड. हेमंत कोलेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजीराव पाटील म्हणाले की, तीनही तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी एकत्र येत जर पूर्ण ताकद लावली तर नक्कीच यश आपल्याला मिळेल आणि भाजपाचा आमदार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यमान आमदारांनी सांगितलाय त्यातला १०० कोटीच निधी त्यांनी आणलेला नाही. त्यापेक्षा जास्त निधी थेट सरकारकडून आपल्याला दिला गेला आहे. त्यातून अनेक गावात विकासकामे केली आहेत. गेल्या काही वर्षात सर्व ठिकाणी भाजपाने आपली सत्ता निर्माण केली आहे.
माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, गरीब माणसाच्या जीवावर तीस वर्षे अपक्ष म्हणून राज्य केले आहे. त्यामुळे विश्वास संपादन करा. जसा मोदी साहेबांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास मिळवलाय तसा कार्यकर्त्यांनी विश्वास संपादन करून एकत्र काम केलं तर नक्कीच सर्व निवडणुकात यश मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संग्राम कुपेकर, भगवान काटे, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, विठ्ठल पाटील, रवींद्र बांदिवडेकर, सुनिल काणेकर, सचिन बल्लाळ, अशोक कदम, ज्योती पाटील, दिपक पाटील, राजू पाटील, चेतन बांदिवडेकर,जानबा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments