कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयात मराठी विभागातर्फे साने गुरुजींचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी विभागाचे प्रमुख प्रा अशोक आलगोंडी यांनी साने गुरुजींचा परिचय करून देत त्यांच्या समग्र कार्याचा आणि साहित्याचा आढावा घेतला. ते म्हणाले ' स्वातंत्र्यसैनिक म्हणून साने गुरुजींनी देशासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. 'पत्री' या त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहात संपूर्ण कविता देशभक्तीपर आहेत. या कवितासंग्रहाचा ब्रिटिशांनी इतका धसका घेतला होता की या पुस्तकावर त्यांनी बंदी घातली. अनेकवेळा तुरुंगवास देखील त्यांनी भोगला. तुरुंगात असतानाच त्यांनी महत्वाची अनेक पुस्तके लिहिली. इथेच वेगवेगळ्या भाषा शिकल्या त्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीची संकल्पना सुचली.
सुरवातीला पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांच्या प्रतिमेला मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. अमोल पाटील, प्रा. एम. एल. कोरे यांच्यासह मराठी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments