बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या सुप्रसिद्ध गायिका आणि वृत्त निवेदिका शुभा कुलकर्णी यांचे आज मंगळवारी दुपारी २ वा. सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बेळगाव येथील वेणुग्राम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

बेळगाव शहरातील सेंट झेविअर्स हायस्कुलमध्ये हिंदीच्या शिक्षिका म्हणून नोकरी करत एका खासगी वृत्त वाहिनीसाठी निवेदिका म्हणून त्या काम करत होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालक म्हणून भूमिका बजावली होती. शुभा कुलकर्णी यांचे पार्थिव हॉस्पिटलमधून थेट अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीकडे नेले जाणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून समजते.