- हिंदुत्ववादी संघटनेचे निवेदन ; चौकशीसाठी दोघांना ताब्यात
निपाणी (प्रतिनिधी) : येथील देवचंद महाविद्यालय समोरील मुरगुड रोडवरील धर्मवीर संभाजी नगरात मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यासह समाज घातक घोषणा देणे व नाम फलकाची तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय काहींनी संभाजी महाराजांच्या सोबत स्वतःचे नाव जोडून महाराजांचा अवमान केला आहे. अशा व्यक्तीचे फलकावरील नाव हटवून त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी (ता.७) समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे केली. यावेळी सदर व्यक्तीवर कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून पोलीस प्रशासनासह नगरपालिकेला निवेदन दिले.
निवेदना मधील माहिती अशी, येथील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर येथे संभाजीमहाराजांच्या नावाचा फलक उभारण्यात आले आहे. संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदू धर्माचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे सदर व्यक्तीने नामफलकावर महाराजांसोबत आपले नाव जोडून महाराजांचा अवमान केला आहे. त्यामुळे एक प्रकारे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून या फलकावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच हा वादग्रस्त फलक हटविण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
याशिवाय संभाजी नगरातील एका कुटुंबाने मोबाईलवर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे संभाजी नगरात मोठा गोंधळ झाला. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून संशय टावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर दोषी आढळल्यास समानता वर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
यावेळी जवळपास अर्धा तासाहून अधिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. वातावरण अधिकच तापू लागल्याने आंदोलकांशी पालिका आयुक्त जगदीश हलगेज्जी उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी चर्चा करून सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलक शांत झाले.
यावेळी श्रेयश आंबले, सुनील दळवी,प्रशांत खराडे, विशाल डांगरे, रोहन पोवार,संदेश हिरूगडे, ओंकार भोईटे, ऋषिकेश खवरे, प्रथमेश मंगसुळे, श्रावण कोळी, सुजल अस्वले, ऋषिकेश बोळके, सुरेश शिंदे, संतोष नलवडे, रमेश पोवार, शुभम गिरी, विशाल चौगले, निलेश शेलार, प्रथमेश कमते, ओंकार चोपडे, सुमित पारळे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments