बेळगाव / प्रतिनिधी 

औद्योगिक वीजबील दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली आज शहरात चन्नम्मा सर्कल  ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी विजबील दरवाढ रद्द  कारण्याबबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव फाऊंड्री क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारे यांनी ,बेळगावातील सर्वच उद्योग आधीच अडचणीत आले असून सरकारने वीज दरात वाढ केल्यास आणखी समस्या निर्माण होणार आहे. ३० ते ४० टक्के उद्योगांचे महाराष्ट्रात स्थलांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही मंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी याप्रश्नी लक्ष घालून वीज दरवाढ त्वरित मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारने दरवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

या बातमीचा व्हिडीओ पहा - 

👇


रोहन जुवळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीज दरवाढ मागे घेण्यासाठी आम्ही सरकारला एक आठवड्याची मुदत देत आहोत, वीज बिलातील वाढ आठवडाभरात मागे न घेतल्यास कर्नाटक राज्यातील सर्व उद्योग बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

लघुउद्योजक संघटना, फौंड्री क्लस्टर, इन्स्टिटयूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन, हॉटेल मालक संघटना आदी विविध संघटनांच्या सदस्यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.