• एक सुवर्ण आणि तीन रौप्यपादकांसह ४ पदकांचा मानकरी 

बेळगाव / प्रतिनिधी 

बसवनगुडी जलतरण संकुल, बेंगळुर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या सेंट पॉल हायस्कूलचा विध्यार्थी अमन अभिजीत सुनगार याने ४ पदके पटकावून उज्ज्वल यश संपादन केले आहे. अमनने 4X100 वैयक्तिक मिडले रिले प्रकारात सुवर्ण पदक, 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य आणि 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक पटकावले.

या यशामुळे २ ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याला प्राचार्य सबेस्टिन परेरा, उपप्राचार्य सॅव्हियो अब्रीयू आणि अँथनी डिसोझा यांनी प्रोत्साहन दिले. प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार आणि त्यांचे बेंगळूर येथील प्रशिक्षक मधुकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रशिक्षण घेत आहे.