- अग्निशमन उपकरणात नायट्रोजन भरताना दुर्घटना
बेळगाव / प्रतिनिधी
भाग्यनगर पहिला क्रॉस येथील अन्नपूर्णा अपार्टमेंट मध्ये असलेल्या एका भाडोत्री गळ्यात अग्निशमन यंत्रात नायट्रोजन वायू भरण्याचा व्यवसाय केला जातो. येथील एक कामगार आज अग्निशमन उपकरणात वायू भरत होता. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त नायट्रोजन वायू भरला गेल्याने उपकरणाचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात उपकरणाचा लोखंडी पत्रा पायावर आढळल्याने कामगार गंभीर जखमी झाला. तर पत्रा आदळल्याने समोर उभ्या असलेल्या मोटारीची काच फुटली.
दुपारच्या वेळी झालेल्या स्फोटाच्या भीषण आवाजाने गल्लीतील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथे एक कामगार गंभीर जखमी झाल्याचे पाहताच, काही नागरिकांनी अधिक उपचारासाठी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र अद्यापही याप्रकरणी पोलीस स्थानकात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.
0 Comments