बेळगाव / प्रतिनिधी
केएसआरटीसी बस आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मिरज - जमखंडी मार्गावर उगार बुद्रुक गावानजीक आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवानेच या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तिघा जखमींपैकी दोघांना अधिक उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून बसच्या पुढील भागाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची सविस्तर माहिती व नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
0 Comments