कल्लेहोळ / गोपाळ पाटील 

बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटना व 'मजदूर नवनिर्माण संघाच्या' वतीने सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी ११ वा. उद्यमबाग (मजगांव) येथील जिल्हा कामगार कार्यालय आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून मनरेगा व बांधकाम कामगारांसह आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी असिस्टंट कमिशनर ए. बी.अन्सारी, जेष्ठ सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते  शिवाजी कागणीकर, ॲड. एन. आर. लातूर यांनी समयोचित विचार मांडले. 

यावेळी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. कार्यक्रमाला कविता मुरकूट्टी, अडव्याप्पा कुंबरगी, समाजसेवक विठ्ठल देसाई, सुनील गावडे, राजू तारीहाळकर, जिल्हा कामगार कचेरीचा अधिकारी वर्ग आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'मजदूर नवानिर्माण संघाच्या' मार्फत मनरेगा कर्मचाऱ्यांच्या वतीने आजच्या दिवशी काम बंद ठेवण्याऐवजी काम सुरु ठेवून कामाच्या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात येईल असे राहुल पाटील यांनी सांगितले.