- आर.एम.चौगुले यांनी व्यक्त केला विश्वास
- बेकिनकेरे येथे तुफानी पदयात्रा
मराठी भाषा, संस्कृती, स्वाभिमान, निष्ठा, अस्तित्व टिकविण्याची ही लढाई आहे. मराठी माणूस हा लढवय्या असून या लढाईत तो विजय मिळवेल, असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर.एम.चौगले यांनी व्यक्त केला. बेकिनकेरे येथे रविवारी भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी बोलत होते. चौगले पुढे म्हणाले, समितीच्या ग्रामीण उमेदवाराला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची झोप उडाली आहे. गावो-गावी प्रचारात तरुणाचा सहभाग वाढू लागला आहे. यावेळी गावात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
बसस्थानकाजवळील गणेश मंदिरापासून प्रचार फेरीला प्रारंभ होऊन गवळी गल्ली, लक्ष्मी गल्ली, नागनाथ गल्ली, मारुती गल्ली, भागात फेरी मार्गस्थ झाली. प्रचार फेरीत युवा तरुणांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सोमनाथ सावंत, संजय सनदी, चंद्रकांत सावंत, अजित यळळूरकर, अनिल सावंत, रवळू सावंत, आदेश यल्लूरकर यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments