• मतदानाच्या पूर्वसंध्येला निवडणुक अधिकाऱ्यांची कारवाई 

चिक्कोडी / वार्ताहर 

महाराष्ट्रातून चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथे जाणाऱ्या एका व्यक्तीला चिक्कोडी चेकपोस्टवर अडवून त्याची झडती घेण्यात आली असता  त्याच्याकडील प्लास्टिक पोत्यात १५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. निवडणुक अधिकाऱ्यांनी ती जप्त केली. याबाबत प्राप्तिकर खात्याला माहिती देण्यात आली आहे. 

संबंधित व्यक्तीवर कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुक मतदानाच्या पूर्वसंध्येला मोठे घबाड जप्त करण्यात निवडणूक अधिकाऱ्यांना यश आले आहे.