- महापौरंसह शिष्टमंडळाचे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी बेळगाव येथे पाकिस्तान समर्थनार्थ देण्यात आलेल्या घोषणा प्रकरणातील संबंधितांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात उपमहापौर रेश्मा पाटील, विहिंपचे नेते कृष्णा भट यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता.
गत १३ मे रोजी शहरातील आरपीडी सर्कल येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या. घोषणा देणाऱ्या संबंधितांच्या अटकेची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी शिरसी व भटकळ येथेही पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
देशभक्त क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला, म्हणूनच ही बाब प्रत्येक भारतीयाला दुखावणारी आहे. त्यामुळे संबंधितांना लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विहिंपचे नेते कृष्णा भट्ट यांनी केली. तत्पूर्वी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महापुरुष शोभा सोमनाचे यांच्याशी बोलताना, बेळगाव आरपीडी सर्कल नजीक पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश देणार असल्याचे आदेश दिले आहेत.
0 Comments