- सौंदत्तीची विद्यार्थिनी अनुपमा श्रीशैल हिरेहोळी बेळगाव जिल्ह्यात प्रथम
बेळगाव / प्रतिनिधी
शिक्षण विभागाने कर्नाटक राज्यातील एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज सोमवार दि. ८ मे रोजी जाहीर केला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती येथील अनुपमा श्रीशैल हिरेहोळी हिने एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. अनुपमा सौंदत्ती येथील श्री कुमारेश्वर ईएम हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.
गतवर्षीच अनुपमा हिच्या वडिलांचे निधन झाले होते, ते सौंदत्ती यल्लमा मंदिरात सेवा बजावत होते. अनुपमाची आई नेत्र रुग्णालयात काम करते.
कौटुंबिक समस्यांचा समर्थपणे सामना करत अनुपमाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनुपमाचे अभिनंदन केले असून सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments