• मतदारांकडून भरघोस पाठिंबा 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी अंतिम टप्प्यातील प्रचारात  सर्वच पक्षांनी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात तळागाळातील जनतेच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला आहे. विशेषत: ग्रामीण मतदार संघात भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. काल शनिवार दि. ६ ते आज रविवार दि. ७ एप्रिल २०२३ पर्यंत ग्रामीण मतदार संघातील  मास्तमर्डी, चंदनहोसुर, करडीगुद्दी, हिंडलगा, उचगाव, खणगाव शगमीमट्टी, वाघवडे, या गावांमध्ये भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचारफेरी आणि सभेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. 

याप्रसंगी प्रत्येक गावातील युवक,महिला आणि जेष्ठ नागरिकांनी भाजप आणि नागेश मनोळकर यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, महाराष्ट्रातील भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह गावातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आदि उपस्थित होते. 

- मास्तमर्डी  येथील प्रचारफेरी आणि सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद




चंदनहोसुर येथील नागरिकांचा नागेश मनोळकर यांना पाठिंबा -

प्रचारफेरी आणि सभेला लक्षणीय उपस्थिती 






- शगमीमट्टी ग्रामस्थांचा नागेश मनोळकर यांना पाठिंबा






-वाघवडे येथील प्रचारफेरी आणि सभा उत्साहात







- करडीगुद्दी येथील प्रचारफेरी आणि सभेला लक्षणीय प्रतिसाद








- हिंडलगा येथे नागेश मनोळकर यांचे जल्लोषी स्वागत -  














उचगाव  येथील प्रचारफेरी आणि सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद -







खणगाव येथील प्रचारफेरी उत्साहात -







-मंडोळी गावात नागेश मनोळकर यांना उस्फुर्त पाठिंबा-