बेळगाव / प्रतिनिधी
कराटे हे स्वसंरक्षणासाठी उत्तम शस्त्र आहे. आणि कराटेचे योग्य प्रशिक्षण घेतलेले कोणीही प्रतिस्पर्ध्याची भीती न बाळगता लढू शकतात, असे उद्गार इंडियन कराटे क्लबचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांनी काढले. इंडियन कराटे क्लब बेळगाव व बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कराटे ब्लॅक बेल्ट पुरस्कार सोहळ्यात कराटेपटूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बेळगाव शहरातील इंडियन कराटे क्लबच्या वतीने तरुणांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत असून रविवारी शहरातील हिंद सोशल क्लब येथे झालेल्या सोहळ्यात आदित्य राज यादव, रिया अजय सातेरी, अनुज पोळी, मुस्कान वडवाणी यांना इंडियन कराटे क्लबचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर व हेमलता यांच्याहस्ते ब्लॅकबेल्ट पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला हेमलता, सुधीर कुलकर्णी, महेश अनगोळकर, सतीश नाईक आदी उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान ब्लॅकबेल्ट धारक कराटे पट्टूंनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ब्लॅक बेल्टधारक कराटेपट्टूनीं सुरुवातीला आम्ही खूप घाबरलो होतो, पण कराटे शिकल्याने आम्हाला अधिक बळ मिळाले आहे. गजेंद्र काकतीकर सर आम्हाला उत्कृष्ट प्रशिक्षण देत आहेत. एक चांगला क्रीडा उपक्रम आम्हाला स्वसंरक्षण आणि क्रीडा कोट्यातील सरकारी नोकऱ्या मिळवून देऊ शकतो, एकूणच असे शिक्षण आपल्या शरीरासाठी आणि देशासाठी हिताचे आहे. अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
0 Comments