बेळगाव / प्रतिनिधी 

मारिहाळ (ता. बेळगाव) येथे तीक्ष्ण हत्याराने वार करून एका युवकाचा चार-पाच युवकांनी मिळून निर्घृण खून केला. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. खून करून आरोपी फरार झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचा शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे. महांतेश रुद्रप्पा करलिंगनावर (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. 


दरम्यान माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पी.व्ही.स्नेहा व मारिहाळ पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणाची नोंद मारिहाळ पोलिस स्थानकात झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.