- विजयपूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील घटना
- एक्सेल तुटल्याने रस्त्याकडेला शेतात उलटली बस
- अपघातात अनेक जण जखमी
विजयपूर / वार्ताहर
निवडणूक कर्तव्यावर निघालेली बस उलटून झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले. हल्लूर क्रॉस (ता. मुद्देबिहाळ जि. विजयपूर) येथे आज मंगळवारी सकाळी मुद्देबिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार सिंदगी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नेत असताना बसचा एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यानजीक शेतात उलटून हा अपघात झाला.
यावेळी बसमधून ४० जण प्रवास करत होते. त्यापैकी १५ हून अधिक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मुद्देबिहाळ येथील निवडणूक अधिकारी चंद्रकांत पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अधिक उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद मुद्देबिहाळ पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments