• चिक्कोडी तालुक्याच्या सदलगा शहरातील घटना
  • घटनेनंतर पती स्वतः पोलीस स्थानकात हजर
  •  पोलिसांसमोर दिली खुनाची कबुली

सदलगा / वार्ताहर 

नेहमीच्या कौटुंबिक भांडणाचे पर्यावसान मोठ्या वादात झाले. यावेळी संतप्त पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा निर्दयीपणे खून केला. सदलगा (ता. चिक्कोडी) शहरात सदलगा पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. अशोक भीमा माने असे खून करणाऱ्या पतीचे तर सुजाता असे मृत पत्नीचे नाव आहे.

पत्नी सुजाता हिचा खून केल्यानंतर अशोक हा स्वतः धारदार शस्त्रासह सदलगा पोलीस स्थानकात हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर सदलगा पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षकांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद सदलगा पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.